पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी लिना अन्नदाते यांची नियुक्ती

वैजापूर ,११ मे  / प्रतिनिधी :- मुंबई येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटी या नामवंत संस्थेच्या संचालकपदी वैजापुरच्या लिना अभिजित अन्नदाते यांची निवड झाली आहे.  

३१ मार्च रोजी घेण्यात आलेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अन्नदाते यांची संथेच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्याचा निर्णय संमत करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व सचिव बौधनकर यांनी अन्नदाते यांच्या वैजापूर येथील निवासस्थानी भेट देऊन अन्नदाते यांना नियुक्तीचे पत्र दिले. लिना या माजी आमदार दिवंगत मा.प.मंगुडकर यांच्या कन्या असून येथील बालरोगतज्ञ डॉ अरविंद अन्नदाते व सामाजिक कार्यकर्त्या आनंदी अन्नदाते यांच्या सुन व स्त्रीरोग तज्ञ डॉ. अभिजित अन्नदाते यांच्या पत्नी होत. सोसायटीच्या विश्वस्तपदी वडिलांच्या  नंतर नियुक्ती होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया लिना अन्नदाते यांनी व्यक्त केली. यावेळी स्तंभलेखक डॉ. अमोल अन्नदाते, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, बौद्ध महासभेचे के.आर. पडवळ, राजवीर त्रिभुवन, चंद्रसेन भोसले, सागर भाटे, साहेबराव पडवळ यांची उपस्थिती होती.