वैजापूर येथील सकल जैन समाजातर्फे आचार्य श्री कामकुमारनंदीजी महाराज यांच्या हत्येचा निषेध

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

वैजापूर,१९ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर येथील सकल जैन समाज बांधवांतर्फे जैन मुनी आचार्य श्री 108 कामकुमारनंदीजी महाराज यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. शहरातील जैन बांधवांनी उपविभागीय कार्यालय, वैजापूर येथे एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण ज-हाड यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

हिरेकुडी ता.चिकोडी जिल्हा- बेळगाव येथे आचार्य पूज्य कुंथूसागरजी महाराजांचे परमशिष्य आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी मुनिमहाराज यांची काही समाजकंटकाकडून दि. ५ जुलै रोज़ी हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करावी, सकल जैन समाजाचे आराध्य गुरु महाराज यांना सुरक्षा प्रदान करावी या मागणीचे  निवेदन देण्यात आले.

त्यासाठी सकल जैन समाज वैजापूरचे मार्गदर्शक बाळासाहेब संचेती यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी श्रावक संघ वैजापूरचे राजेंद्र संचेती, निलेशकुमार पारख, सुनंदीलाल बोथरा, अमृत बोथरा, सागर संचेती, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रुपेश संचेती, माजी चेअरमन हेमंतकुमार संचेती, प्रफुल संचेती, अशोकचंद संचेती, प्रकाशचंद छाजेड, संदिप संचेती, हिरालाल संचेती, प्रकाश हिरण, शैलेश संचेती, सुमितलाल बोथरा, संजय संचेती, विजयकुमार कासलीवाल, डॉ.संतोष गंगवाल, श्रेयस कासलीवाल, आनंद गंगवाल, पीयुष पाटणी, प्रदिप झांजरी, मनेष संचेती, महावीर ठोळे, संतोष पाटणी, कांतीलाल कासलीवाल, निखिल कासलीवाल, पवन लोहाडे, अनुप पहाडे, कैलास बोहरा, राजू संघवी, सरोज गंगवाल, राखी बोहरा, सिमा संघवी, संगीता लोहाडे, आशा पाटणी, सौ.पांडे, शैला गंगवाल, त्रिशला गंगवाल आदी उपस्थित होते… डॉ.संतोष गंगवाल यांनी सदरील निवेदन वाचून दाखवत आपल्या भावना सर्वांसमोर मांडल्या. नवकार मंत्र पठणाने स्वर्गीय मुनी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.