वैजापूरात गोडाऊन फोडून 1 लाख 65 हजाराचे साहित्य लंपास

वैजापूर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-शहरातील येवला रस्त्यावरील नंदलाल बोथरा (रा. अहिंसा नगर, औरंगाबाद) यांच्या मालकीच्या सुरज कॉम्प्लेक्समधील दहा बंद दुकाने व एका गोडाऊनचे कुलुप तोंडुन चोरांनी पंपाचे लोखंडी सामान, अल्युमिनियम चौकट, खिडक्या, दरवाजे, दोन होंडा कंपनीचे जुने जनरेटर, एक किर्लोस्कर कंपनीचे जुने जनरेटर, दहा लोखंडी शटर, पंपाचे छताचे लोखंडी सामान, पंपाचे सहा लोखंडी खांब असे जुने वापरते बारा ते पंधर टन वजनाचे व दुकानांमधील लोखंडी वखर, नांगर, दहा अश्वशक्ती क्षमतेच्या दोन विद्युत मोटार, दहा सागवानी. लाकडाच्या चौकटी, 35 लोखंडी पेट्या, लोखंडी टाकी, कंपनीच्या नावाचे लोखंडी फलक हे साहित्य चोरुन नेले. या साहित्याची एकुण किंमत एक लाख 65 हजार रुपये असून हे साहित्य सचिन पेरे याने त्याच्या एका‌ साथीदारांच्या मदतीने 16 जून रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास मालवाहु रिक्षामध्ये टाकून चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात उघड झाल्याचे बोथरा यांनी तक्रारीत म्हंटले आहे. सचिन पेरे हा बोथरा यांच्या पेरोल पंपावर कामाला होता. पण त्याला एप्रिल महिन्यात कामावरुन काढून टाकले आहे.