वैजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांची टिफीन बैठक

वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :-भारतीय जनता पार्टी वैजापूर विधानसभा -112 छत्रपती संभाजीनगरच्यावतीने टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती. 

बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या टिफीन पार्टीस वैजापूर विधानसभा प्रमुख डॉ.दिनेश परदेशी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, भाजपचे  तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, माजी नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे, प्रशांत कंगले , कैलास पवार, प्रेम राजपुत, सुरेश राऊत, नारायण कवडे, शैलेश पोंदे, सोनु राजपुत, सागर राजपुत, जितु पवार, प्रकाश  गायके, महेंद्र काटकर, किरण व्यवहारे, प्रदीप चव्हाण, महेश भालेराव, प्रताप महेर, संतोष मिसाळ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.