केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्ताने लासुरगाव व धोंदलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांच्यावतीने  धोंदलगाव व लासुरगाव जिल्हा परिषद शाळेतील एक हजार एक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमास प्रदेश कार्यकारीणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा प्रभारी डॉ.दिनेश परदेशी, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दागोडें, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील वाणी, धोंदलगाव च्या सरपंच जयश्री पानसरे, भाजपचे तालुका कोषाध्यक्ष संतोष पाटील मिसाळ, तालुका सरचिटणीस प्रताप सिंह मेहर, सुरेश पानसरे, राजीव देशमुख संतोष पाटील आवारे, विपीन साळे, वसंत शेलार, गजू श्रीखंडे, सचिन घोडके, दत्तू आवारे, शालेय समिती अध्यक्ष पप्पू पाटील वाघ, अवधूत ठोंबरे, उमेश वाघ, प्रमोद देशमुख, राजू कवार, साईनाथ डमाळे, भारत वाघ, अमोल वाघ, भगवान आवारे, रवी आवारे, रमेश पाटील जाधव, प्रल्हाद डमाळे, नितीन डमाळे, संभाजी मगर, मुख्याध्यापक सुराशे, कांगणे सर यांच्यासह धोंदलगाव व लासुरगाव शाळेतील शिक्षक वृंद व भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.