संजय राऊत वेडा झाला;पिसाळलेल्या कुत्र्याला इंजेक्शन द्यावे लागेल- संजय शिरसाट

मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा व्यवहार २ हजार कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करत संजय राऊत हा वेडसर माणूस आहे आणि सायको माणसाच्या विधानाला किती महत्व द्यायचे?, असे म्हणत संजय राऊत यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी करत त्याला आता इंजेक्शन द्यावे लागेल, अशी खरमरीत टीका केली.

पिसाळलेल्या कुत्र्याला इंजेक्शन द्यावे लागते तेव्हा ते शांत होते. थोडे दिवस थांबा, योग्य वेळ आली की आम्ही इंजेक्शन देऊ, असेही शिरसाट म्हणाले.सध्या संजय राऊत यांनी आमदारांना बजावण्यात येणाऱ्या व्हिपबाबत काळजी घ्यावी. पक्षाकडून बजावण्यात येणारा व्हिप जर पाळला गेला नाही तर आमदारांवर निलंबनाची कारवाई होईल, असेही संजय शिरसाट म्हणाले.