वसंत क्लब वैजापूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान

वैजापूर, १० ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वसंत क्लब वैजापूरतर्फे “जय शिवराय” आणि गुड मॉर्निंग” या पुस्तकांचे लेखक प्रशांत देशमुख (रायगड) यांचे “जगणे सुंदर आहे” या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम मंगळवारी (ता.9) झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर होते. व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी अतिशय सुंदरपणे “जगणे सुंदर आहे” या विषयावर आपले विचार मांडले.

प्रारंभी क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे, सचीव जफर ए.खान, संचालक मेजर सुभाष संचेती यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्लबचे सहसचिव डॉ. संतोष गंगवाल यांनी केले तर सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कार्यक्रमास माजी.नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे संजय पाटील निकम, डॉ.एस.एम.जोशी, आसाराम पाटील रोठे, मनाजी पाटील मिसाळ, पी.जी.पवार, प्रा.के.ए.मगर, गोपालदास आसर, सरकारी अभियोक्ता नानासाहेब पाटील जगताप, क्लबचे संचालक मेजर सुभाष संचेती, बाबुराव परदेशी, कय्युम सौदागर, संजय बत्तीसे, भगवानसिंग राजपूत, सचिन दहीभाते, जिल्हा दूध संघाचे रहीम खान, ग्राहक संघटनेचे दामोदर पारीख, राजू केदार, महेश पाटील बुणगे, सूर्यकांत सोमवंशी, सलीम वैजापूरी, पत्रकार प्रशांत त्रिभुवन, दिगंबरराव गायकवाड, किशोर साळुंके, महावीर बाफना, श्रीराम गायकवाड, वसंतराव कदम, किशोर राजपूत, बाळासाहेब जाधव, हनुमान पारीख, प्रमोद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.