बापाला वृद्धपकाळात विसरणे, त्यांची हेळसांड करणे या सारखे दुसरे पाप या जगात नाही-ह.भ.प.कबीर महाराज

वैजापूर,१३ एप्रिल  /प्रतिनिधी :- या विश्वातील एकमेव दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे प्रत्येक मुलां-मुलींचा जन्मदाता बापच असतो ज्या बापाने अत्यंत हलाकीत जीवन जगलेले असते, काबाड कष्ट करून मुलां-मुलींचे आयुष्य घडवून त्यांना सक्षमपणे आयुष्यात उभे केले असते त्या बापाला वृद्धपकाळात विसरणे, त्यांची हेळसांड करणे या सारखे दुसरे पाप या जगात नाही. असे वक्तव्य मुस्लिम युवा कीर्तनकार अत्तार-(पुणे) यांनी  बुधवारी(ता.13) येथील सूरज लॉन्स येथे आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात केले.

कै,सोपानराव शंकरराव गायकवाड यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध प्रसंगी कीर्तनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,माणसाने जीवन जगत असतांना माणुसकीने जगावे, मानवता धर्म टिकवावा व समाजातील  प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी व्हावे  हे खरे जगणे आहे”.याप्रसंगी नगरसेवक गणेश खैरे, स्वप्नील जेजुरकर, नगरसेविका शोभाबाई भुजबळ,सुभाष गायकवाड, धोंडीरामसिंह राजपूत श्री.डोंगरे,  यांनी श्रद्धांजली वाहिली.याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.