कोरोना चौथ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी शासनासोबत जनतेचे सहकार्य आणि सतर्कता महत्वाची — राज्यमंत्री संजय बनसोडे

बीड येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीड,१ मे /प्रतिनिधी :- महाराष्ट्र दिन 62 व्या वर्धापदिन सोहळ्यानिमित्त राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन कार्यक्रम उत्साहात झाला.बीड पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सोहळ्यात बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली.

May be an image of 8 people and people standing

समारंभास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

May be an image of 5 people, car and outdoors

ते म्हणाले, कोरोना संसर्ग जगातून पूर्णपणे गेलेला नाही, विविध देशात आजही लॉकडाऊन सुरु आहेत. आपल्या देशाला देखील भविष्यात चौथ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत आहे. जनतेला कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात आणि बीड जिल्ह्यात मोफत कोरोना लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.

May be an image of 6 people, people standing and text that says 'QRT'

ते पुढे म्हणाले, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात विकास योजनांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जिल्ह्याचे नाव विविध विकासकामांच्या यशस्वी अंमलबजावणी साठी घेतले जात आहे. असे सांगून ते म्हणाले, लसीकरणाचा पहिला डोस 18 लाख 44 हजार नागरीकांना दिला गेला आहे. 12 लाख 52 हजार जणांना दुसरा डोस तर 31 हजार नागरीकांना बुस्टर डोस देण्यात आला आहे. यासाठी मी बीड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई आणि संबंधित यंत्रणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीक यांची भेट घेऊन राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड संगीता चव्हाण, श्री. राजेश्वर चव्हाण, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री महोदयांच्या हस्ते पोलिस सन्मान प्राप्त केलेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी, तसेच महावितरण व महसूलचे अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

May be an image of 3 people, people standing and outdoors

मंत्री महोदयांच्या हस्ते यावेळी पोलीस महासंचालकांचा सन्मान पदक प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक नारायण साबळे, पोलीस देविदास जमदाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बाबर, महावितरणचे अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप, परळी येथील जिल्ह्यातील उत्कृष्ट तलाठी पुरस्कार मिळालेले विष्णू गीते यांचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.ध्वजारोहण नंतर पोलीस दलाच्या पथकांनी संचलन सादर केले.

May be an image of 6 people and people standing

उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संचलनात जिल्हा पोलिस दलाचे सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड पुरुष पथक, महिला होमगार्ड यांचे पथक आधी पथकांनी सहभाग घेतला. त्याच बरोबर 108 ऍम्ब्युलन्स, पोलीस ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाचे वाहन, दंगल नियंत्रक वरून वॉटर कॅनन यांनी संचालनात सहभाग घेतला.