वीरगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे उदघाटन

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वीरगांव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरगाव शाखेचे स्थलांतर व नूतनीकरण उदघाटन सोहळा आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते रविवारी झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार नितीन पाटील हे होते.

या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, आप्पासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, शिवाजीराव आधुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, कैलास आबा सुरासे, माजी उपसभापती प्रभाकर पाटील बारसे, सोपानराव बारसे, विलास थोरात, पंजाबराव थोरात, संजय पाटील शिंदे, काशिनाथ सोमवंशी, कोंडिराम सोमवंशी, अंबादास डहाके, बापूसाहेब डहाके, नानासाहेब थोरात, भरत पाटील कदम यांच्यासह ग्रामस्थ व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.