पतीने पत्नीस विषारी औषध पाजले ; पतीवरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने पत्नीस विषारी औषध पाजणाऱ्या पती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वैजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शनिवारी दुपारी घडली.अमोल कडुबापू वारकर रा. खोपडी ता कोपरगाव असे आरोपीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वारकर याचे १३ मार्च २०२३ रोजी करिश्मा देवराव सोनवणे या मुलीशी लग्न झाले होते. परंतु त्यांचा जुना वाद होता.हा वाद न्यायालयात चालू होता. हा वादात न्यायालयात मिटल्यानंतर अमोल याने पत्नीस टाळले.त्यानंतर शनिवारी (ता.15) दुपारी तिला वैजापूर येथे बोलावून विषारी औषध पाजले. करीश्मा हीस गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले. या प्रकरणी करिश्मा हिने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल वारकर विरूद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.