केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते सर्वसामान्य नागरिका कडून शुभेच्छांचा वर्षाव

छत्रपती संभाजीनगर,१६ जुलै  / प्रतिनिधी :- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने शहरात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये वृक्षारोपण ,खासदार स्थानिक  विकास निधितून विविध कामाचे उदघाटने ,पेव्हर ब्लॉक बसविणे भूमिपूजन राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. भागवत कराड यांना शुभेच्छा पत्राद्वारे दिल्यात. नव भारताच्या उभारणीमध्ये आपले प्रयत्न ,काम करण्याची शक्ती ही महत्वाची आहे.असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी डॉक्टर कराड यांना निरोगी, दीर्घ आयुष्य लाभो असे, आपल्या  शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट दूरध्वनीवरून संपर्क करून डॉ.कराड यांना शुभेच्छा दिल्यात.


राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भाजपाचेपदाधिकारी आणि नेत्यांनी डॉक्टर कराड साहेबांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्यात.सकाळपासूनच कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी एन थ्री येथील निवासस्थानी गर्दी केली होती. आणि डॉ.कराड यांनी देखील शुभेच्छांचा स्वीकार करत प्रत्येकाशी संवाद साधला.यामध्येपोलिस आयुक्त मनोज लोहिया,माजी महापौर नंदू घोडे ले, एल.आय.सी.चे दिगंबर संजय रामधरणे , बिल्डर असोसिएशन जबिंदा ,सर्व विकास अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घरड ,यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्यात.

शिरमाळ ,तालुका रत्नपूर येथे सकाळी दहा वाजता गायत्री ज्ञानसाधना केंद्र,तसेच भारतीय सेना १३६ बटालियन तर्फे एकावन्न हजार वृक्षरोपण डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देव संस्कृतिक विश्वविद्यालय हरिद्वार येथील कुलगुरू डॉक्टर चिन्मय पांड्या, कर्नल निर्देश शहा उपस्थित होते.रत्नपूर येथे जागृत भद्रा मारुती चे दर्शन घेतले, यावेळी भद्रा मारुती संस्थांनचे अध्यक्ष मीठू बारगळ यांच्या हस्ते डॉ.कराड यांचा सत्कार केला.

वेरूळ येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे डॉ. भागवत कराड आणि डॉ.अंजली कराड यांनी सपत्नीक अभिषेक केला.यावेळी मराठवाड्यातील जनता व बळीराजाच्या जीवनात सुख समृध्दी लाभू दे तसेच चांगले पर्जन्यमान होऊ दे या करिता प्रार्थना केली.

खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ बजाज नगर/वडगाव कोल्हाटी येथे अंतर्गत पेव्हर ब्लॉक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी भाजयुमो संभाजीनगर पश्चिम तालुका अध्यक्ष श्री.आकाश पवार जी,गरुड झेप अकॅडमीचे संचालक श्री.सूरज सोनवणे जी,श्री.बडगुजर जी,श्री.संजय पाटील जी,सौ.मीनाताई शिंदे जी,सौ.दुर्गाताई पाटील,श्री.अमित राठोड,श्री.कृष्णा बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने आय. एम. ए हॉल येथे सहकारी संस्थांचे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटनही डॉक्टर कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकारी संस्थांना बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर भागवत कराड यांनी दिले.

श्री. वर्धमान श्वेतांबर स्थानक वाशी जैन श्रावक संघ महावीर जैन गोशाळा, चिकलठाणा येथे गोमाता चारा वाटप करण्यात आले. गोशाळेमध्ये  चंदू जगदीश बियाणी, मामाजी बोहरा,संदीप चांडक यांनी डॉ कराड यांचा वाढदिवस साजरा केला.

छत्रपती संभाजी नगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील श्री स्वामी नारायण मंदिर, उल्कानगरी येथे कार्यकर्ता डब्बा पार्टी मध्ये साहभाग मिळविला आणि वाढ दिवस साजरा केला. यावेळी समाधान मंत्री संजय कोडगे,किरण पाटील, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, जालिंदर भाऊ शेंडगे राजेभाऊ शिंदे थोरात, दिलीप थोरात अरविंद डोणगावकर सुरेंद्र कुलकर्णी महिला श्रीमती माधुरी अदवंत, श्रीमती साधनाताई सुरडकर, श्रीमती सविताताई कुलकर्णी, क्रांती चौक मंडळ अध्यक्ष अजय शिंदे, प्रदेश सचिव अनिल मकरिये,धनंजय कुलकर्णी,
राजू शिंदे उपस्थित होते.

मध्य विधानसभा मतदासंघातही वाढदिवस साजरा करण्यात आला.भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.संजय केनेकर,महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई भोसले ,शहराध्यक्ष श्री.शिरीष बोराळकर ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.अनिल मकरिये उपस्थित होते.

अंध निवासी प्रशिक्षण संस्थेतील मुलीं समवेत केला वाढदिवस साजरा

ए.एस.क्लब येथील राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचालित कैलास वासी श्री रंगलाल रामरतन बाहेती अंध मुलींचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी मुलींच्या प्रशिक्षण केंद्रासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही डॉक्टर भागवत कराड यांनी दिले.

डॉ. तापडिया चारी प्रबल ट्रस्टच्या वतीने ए.एस.क्लब येथे रंगलालजी रामरतनजी बाहेती अंध मुलींचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण आहे . या केंद्रामध्ये किमान 50 मुलींना राहण्याचे सोय आणि प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर निराधार मुलींना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदतही करण्यात येते. आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन अंदमुलीं समवेत आपला वाढदिवस साजरा केला या समयी प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थाक मधुकर सूर्यवंशी,अनिल चोरडिया,हेमंत खेडकर,सतीश पाटील,विष्णू पंत खेडकर, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्राचार्य ज्ञानेश्वर बडकर यांनी प्रशिक्षण संस्थेसाठी संरक्षण भिंत आवश्यक असून त्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी द्यावा अशी विनंती केली.त्यावेळी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड किमान यांनी पाच लाखाचा निधी देईल, विकास कामासाठी निधी कमी पडत असेल तर बँकेच्या सीएसआर निधी मधून मदत करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर भागवत कराड यांनी दिले.

रामराव महाराज ढोक यांचा जाहीर कीर्तन सोहळा

जन्मदिनाचे औचित्य साधून काल जयस्वाल हॉल, हडको, छत्रपती संभाजीनगर येथे ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचा जाहीर कीर्तन सोहळा झाला. यावेळी विविध नागरिक, माता-भगिनी यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे , भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.संजय केनेकर , भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहन आघाव , श्री.नागनाथ केंद्रे, माजी नगरसेवक श्री.महेश माळवतकर , भाजपा हडको मंडळ अध्यक्ष श्री.सागर पाले यांचेसह मान्यवर उपस्थित होते.