वैजापूर तालुक्यातील पानवी खंडाळा ग्रामपंचायतीत वैद्य तर लाख खंडाळा ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाचा विजय

वैजापूर,​६​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- लाख खंडाळा ग्रामपंचायतीवर काळू पाटील वैद्य, सीताराम वैद्य यांच्या तर पानवी खंडाळा ग्रामपंचायत ही शिंदेसेना भाजप युतीने ताब्यात घेतली आहे.

वैजापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पुर्ण झाली. पानवी खंडाळा व लाख खंडाळा अशा दोन ग्रामपंचायती मधील प्रत्येकी सात जागांचा निवडणूक निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या दोन्ही ग्रामपंचायतीसाठी निवडणूक विभागाकडून गुरुवारी मतदान घेण्यात आले होते.शुक्रवारी त्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील पानवी खंडाळा व लाख खंडाळा ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या दोन्ही ग्रामपंचायतच्या प्रत्येकी ७ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. पानवी खंडाळा ग्रामपंचायतसाठी १६ तर लाख खंडाळात १५ उमेदवार नशीब आजमावत होते. पानवी खंडाळात ८४४ तर लाख खंडाळात ९०६ मतदारांनी मतदान केले होते. राजस्व विभागाचे नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी विष्णु बिरेवाड यांनी मतमोजणी पूर्ण करुन विजयी उमेदवारांचे नावे  जाहीर केली. निवडणूक विभागाचे गणेश चौकडे, ज्ञानेश्वर वाळुंज, प्रवीण पंडीत यांनी मतमोजणीला सहकार्य केले.

लाख खंडाळा ग्रामपंचायतीवर काळू पाटील वैद्य, सीताराम वैद्य यांच्या तर पानवी खंडाळा ग्रामपंचायत ही शिंदेसेना भाजप युतीने ताब्यात घेतली आहे. लाख खंडाळा येथील रेखा गायकवाड यांनी आपल्या प्रतिस्पर्धी मंदा गायकवाड यांचा अवघ्या ४ मतानी पराभव केला. पानवी खंडाळा येथील सरपंच पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी तर लाख खंडाळा येथील सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.पानवी खंडाळा ग्रामपंचायतच्या प्रभाग एकमध्ये अनिल बागुल, वच्छलाबाई सोनवणे, प्रभाग दोनमध्ये ताईबाई बावचे, उज्वला बावचे, मीरा बावचे, प्रभाग तीनमध्ये सोमनाथ बावचे, सविता बावचे.
लाख खंडाळाच्या प्रभाग एकमध्ये दीपक वैद्य, संगिता देवकर, प्रभाग दोनमधून दत्तात्रय वैद्य, रेखा गायकवाड, शारदा देवकर तर प्रभाग तीनमधून अर्चना पवार व ताराबाई साळुंके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार मंडळीचे उमेदवारांना पराभवाचे तोंड पहावे लागले.