वैजापुरात डिझेल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना पकडले पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वैजापूर ,१४ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील बजरंग चौक ते खान गल्ली रस्त्यावर डिझेल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून ५ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अमोल अविनाश कुंदे (१९ राहणार, राहता) व सोमनाथ ज्ञानेश्वर बोर्डे (२५, राहणार, वैजापूर) अशी त्यांची नावे आहेत. तो सध्या शिर्डीला राहत होता. यांच्या ताब्यातुन पांढऱ्या रंगाची पाच लाख रुपये किंमतीची कार, अमोल कुंदे यांच्या ताब्यातुन दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व सोमनाथ बोर्डे यांच्या ताब्यातुन दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व एक हजार रुपये किमतीचे पाच ३५ लिटर क्षमतेचे प्लास्टिक कॅन, एक स्क्रु ड्रायव्हर, एक पक्कड, पाईप, बॅटरी असे साहित्य पोलिसांनी‌ हस्तगत केले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक के.एल.पवार, पोलिस नाईक योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, महेश बिरुटे, संभाजी भोजने, प्रशांत गीते, उमेश जमदाडे, रणजित चव्हाण यांनी केली. याप्रकरणी महेश बिरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास हेड कॉन्स्टेबल डी.एस. शिंदे हे करीत आहेत.