वैजापुरात जुलूस-ए- गौसिया मिरवणूक उत्साहात

वैजापूर, ८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-

गौस-ए-आजम हजरात शेख अब्दुल कादिर लिलानी रहेमतूल्लाह अलैहं  यांच्या अकराव्या शरीफ सणानिमित  सोमवारी मुस्लिम बांधवांनी  अहले सुन्नत व जमाऊत यांच्यावतीने शहरातून

भव्य मिरवणूक काढली. ही मिरवणूक भाजीमंडी, परदेशी गल्ली, टिळक रोड, स्टेशन रोड, पोलीस स्टेशन मार्गे नौगाजीबाबा दर्गा येथे पोहचल्यानंतर तेथे समापन करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना या ठिकाणी महाप्रसाद ही वाटप करण्यात आला. 

या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष साबेरखान अमजद खान, माजी नगरसेवक हाजी शेख अकिल, शहर काझी हाफीजुद्दीन काझी,  काँग्रेसचे शहराध्यक्ष मलिक काझी, सय्यद जुबेर, गयास मामू, रहीम खान, खलिल मिस्तरी, काझी लईक इनामदार, सुलतान खान, आमिर अली यांच्यासह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.