अपहरण गुन्हयातील फरार आरोपीस पिस्तुल व जिवंत काडतुसासह अटक:वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर,२५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- अपहरण गुन्ह्यातील फरार आरोपी उमेश रमेश निगळ 25 वर्ष रा.कापूसवाडगाव ता. वैजापूर याला लाडगाव चौफुली येथे रात्री शिताफीने पकडण्याची कारवाई वैजापूर पोलिसांनी केली.त्याच्याकडून पिस्तुलासह व जिवंत काडतुस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.आरोपी निगळ याने त्यांच्या नात्यातील मुलीचे अपहरण केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल होता.गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार  होता.

शनिवारी रात्री लाडगाव चौफुली परिसरात पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक  श्रीराम काळे, पोलीस नाईक योगेश झाल्टे, अमोल मोरे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याल8च्या ताब्यातून गावठी पिस्तूल  व काडतूस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.