विरगाव ते शिरसगाव – जातेगाव,वक्ती, पानवी बुद्रुक राज्यमार्ग कामाचे भूमीपूजन

वैजापूर ,१२ जुलै /प्रतिनिधी :-सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत तालुक्यातील “विरगाव ते शिरसगाव-जातेगाव-वक्ती-पानवी बुद्रुक रामा-65” रस्ता मजबुतीकरण व डांबरीकारणासाठी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नातून 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन बुधवारी (ता.12) सिरसगाव येथे आ. बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, उपकार्यकारी अभियंता अजित रोडगे, शाखा अभियंता भारती, सरपंच काकासाहेब निंबाळकर, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, साहेबराव पाटील पवार, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील झिंजूर्डे, संभाजी डांगे, विठ्ठलराव गवळी, नारायण विखे, विलास थोरात, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, रजनीकांत नजन, प्रशांत त्रिभुवन, युवासेना जिल्हासमन्वयक अमीर अली, तालुका समन्वयक गणेश निकोले, उपतालुकाप्रमुख डॉ.प्रकाश शेळके, सोमनाथ पाटील भराडे, विभागप्रमुख रामनाथ पाटील तांबे, प्रभाकर जाधव, नानासाहेब थोरात, उपविभागप्रमुख भावराव दुशिंग, संजय पाटील शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख रामेश्वर पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.