वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन

वैजापूर ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथील विविध विकास कामासाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने 18 लक्ष 11 हजार रुपये निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमीपूजन माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले.

आ.रमेश पाटील बोरणारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.आ.बोरणारे यांच्या प्रयत्नाने शासनाच्या विविध योजनेतून मंजूर झालेल्या नांदगाव येथील जगदगुरु स्वामी नरेंद्र महाराज सत्संग सभामंडप बांधकाम ( 7 लक्ष रुपये ), गायकवाड वस्ती येथे मारुती मंदिर सभागृह बांधकाम ( 5 लक्ष रुपये ), नांदगांव आश्रमासाठी स्वच्छतागृह बांधकाम  ( 4 लक्ष रुपये ) गाढे वस्ती रस्ता मजबुतीकरण ( 2 लक्ष रुपये) अशा एकूण 18 लक्ष 11 हजार रुपये खर्चाच्या या विकास कामांचे भूमीपूजन माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, उपतालुकप्रमुख मोहनराव साळुंके,माजी पंचायत समिती सदस्य आर.डी.थोट, भाऊसाहेब पाटील गलांडे,खंडू पाटील गाढे, महेश बुणगे, प्रदीप साळुंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.