औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक :सरासरी ६४.४९ टक्के मतदान

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

औरंगाबाद, दिनांक 01 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.  यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 64.49 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात सरासरी सुमारे ६४.४९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिली.

यावेळी गेल्या दोन पदवीधर निवडणुकीत विजय मिळवलेले महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण तसेच महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्येच मुख्य लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ तसेच अपक्ष असलेले रमेश पोकळे व सिद्धेश्वर मुंडे यांना मिळणारी मतेही मतेही निर्णायक ठरु शकणार आहेत. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ३५ उमदेवारांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले.

जिल्हानिहाय झालेले मतदान

जिल्हा———- झालेले मतदान ————- टक्के

औरंगाबाद———-६७०७४—————–६३.०५

जालना————–१९८०७—————६६.५४

परभणी————-२२०६२—————६७.४४

हिंगोली—————१०९९४————–६५.५८

नांदेड——————३१५७८————-६४.०४

लातूर——————२७२३०————६६.११

उस्मानाबाद———–२२५२३————६६.९७

बीड——————३९३८१————-६२.०८

———————————————————.

एकूण—————-२४०६४९————-६४.४९ टक्के

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीबजावला मतदानाचा हक्क

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किल्लेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात आज दुपारी 12 वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर श्री. चव्हाणे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील 206 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. तसेच कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भाव पाहता सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच लोकशाही बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी यावेळी पदवीधर मतदारांना केले.