सामर्थ्य प्रिमियर लीग’मध्ये साई ॲडव्होकेट, एएसआर, टूल टेक संघ विजयी

अजय शितोळे, गजानन भानुसे, योगेश तायडे ठरले सामनावीर

औरंगाबाद, दिनांक 18 : ‘सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग’मध्ये पाचव्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये साई ॲडव्होकेट, एएसआर इंडस्ट्री आणि टुल टेक अकॅडमिया यांनी अनुक्रमे रेयॉन सामर्थ्य, बालाजी वॉरियर्स आणि चंद्रा मीडिया इलेव्हन या संघावर विजय मिळवला. दिवस भरात झालेल्या तिन्ही सामन्यात अजय शितोळे, गजानन भानुसे, योगेश तायडे यांनी सामनावीराचा मान पटकावला. 
एमजीएमच्या क्रिकेट मैदानात गुरुवारी (ता. १८) हे सामने खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात रेयॉन सामर्थ्य संघाने सर्व गडीबाद ७६ धावा केल्या. त्यामध्ये गिरीश यांनी ३७ चेंडूत ४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात साई ॲडव्होकेट संघाने अजय शितोळे यांनी ३४ चेंडूत ४५, तर अमोल काकडे (१६) चार गड्यांच्या मोबदल्यात ११.२ षटकात आव्हान पुर्ण केले. 
दुसऱ्या सामन्यात बालाजी वॉरियर्सच्या अजय देशमुख यांनी २४ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. अभय भोसले (२०), समीर सोनवणे (२३) यांनी चांगली साथ दिली. संघाला आठ बाद ११० धावांपर्यंत मजल मारता आली. गजानन भानुसे यांनी चार गडी बाद केले. प्रत्युत्तरात एएसआर इंडस्ट्री संघाच्या गजानन भानुसे यांनी ३२ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. किरण जगताप (३३)अजय देशमुख (३१) यांनी १३.५ षटकांत चार गड्यांच्या बदल्यात विजय मिळवला. समिर सोनवणे यांनी दोन गडी बाद केले.

Displaying IMG_7508.JPG


तिसऱ्या सामन्यात विकास शिंदे (२९) गजानन लोमटे (२०), डॉ. रविंद्र काळे (१५) यांच्या धावांच्या जोरावर टुल टेक अकॅडमी संघाने १५ षटकांत ९ गडी बाद १२२ धाव संख्या उभारली होती. प्रत्युत्तरात चंद्रा मीडिया इलेव्हन संघाला ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ९८ धावा करता आल्या. त्यात विजय भुजाडी (२६) आणि संदीपने १६ धावांच योगदान दिले. या सामान्यात टूल टेक संघ विजय ठरला.