राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून वाणी कुटुंबियांचे सांत्वन

वैजापूर ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी आज वैजापूर दौऱ्यावर असतांना वैजापूर चे माजी आमदार स्व.आर.एम. वाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आ.रमेश पाटील बोरणारे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.