दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यास नगरपालिका कटिबद्ध – नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी

वैजापूर नगरपालिकेतर्फे दिव्यांग दिन साजरा

वैजापूर ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वैजापूर वैजापूर नगरपालिकेतर्फे शुक्रवारी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील दिव्यांग व्यक्तींना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांचे मानसिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यात आले. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील दिव्यांग व्यक्तींचा नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी व मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षमीकरण करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले.

दिव्यांगांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना सक्षम करण्याचे काम नगरपालिका भविष्यातही करणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या तर मुख्याधिकारी बिघोत यांनी शहरातील दिव्यांग व्यक्तींचे बचत गट तयार करून त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेतर्फे प्रयत्न केले जातील तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येईल असे सांगून जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.जागतिक दिव्यांग दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत व समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन यांनी परिश्रम घेतले.