शिवराई येथील ऋषीकेश डांगे या विद्यार्च्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश ; आ.बोरणारे यांनी केला ऋषीकेश डांगे याचा सत्कार

वैजापूर ,९ जुलै /प्रतिनिधी :-​वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील ऋषिकेश प्रकाश डांगे या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून निवड झाली. ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याने 

तालुक्याच्या वतीने आ.रमेश पाटील बोरणारे यांनी रविवारी (ता.08) ऋषीकेश डांगे या विद्यार्थ्याचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आ. बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयात हा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, बाळासाहेब पाटील जाधव, उपविभागप्रमुख संभाजी डुकरे, राजेंद्र चव्हाण, प्रकाश डांगे, दिलीप भांडे, चंदनसिंग बेडवाल, अक्षय राजपूत, जालमसिंग महेर व ग्रामस्थ उपस्थित होते.