वैजापूर शहरातील शिवाजी रोड या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ. बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर, ९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राज्य सरकारच्या नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून वैजापूर शहरातील तीन प्रमुख रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामासाठी 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी शिवाजी रोड या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ बुधवारी आ.रमेश बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान अमजदखान भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु. बिघोत, अभियंता प्रकाश पाटील, नगरसेवक डॉ. निलेश भाटीया, ज्ञानेश्वर टेके, दशरथ बनकर, रणजित चव्हाण, प्रकाश मतसागर, गोकुळ भुजबळ,शासकीय गुत्तेदार संदीप बोर्डे, कपिल आसर, मेहुल पोकर्णे, दीपक बोर्डे, महेश गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे वैजापूर शहराच्या विविध विकासकामांसाठी जवळपास 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीपैकी शहरातील शहरातील टिळक रोड, शिवाजी रोड व जुना स्टेट बँक रोड या तीन प्रमुख रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे तीन कोटींचा निधी मंजूर आहे. या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून शिवाजी रोड या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज झाला.