वैजापूर येथे ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह ; सप्ताह कार्यालयाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-ब्रह्मलीन, सदगुरू गंगागिरीजी महाराज यांचा 176 वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर येथे 21ऑगस्ट 2023 ते 28 ऑगस्ट 2023 दरम्यान होणार असून या सप्ताह कार्यालयाचे उदघाटन श्रीक्षेत्र सराला बेटचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याहस्ते रविवारी (ता.09) पूजन व पुस्तिका प्रकाशन करून करण्यात आले.

या कार्यक्रमास आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, अँड. प्रमोददादा जगताप, वैजापूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन भगवाननाना तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, पंकज ठोंबरे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, बाजार समितीचे संचालक कल्याण जगताप, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत, नगरसेवक डॉ.निलेश भाटिया, शैलेश चव्हाण, संजय पाटील बोरणारे, रणजित चव्हाण, रहीम खान, बाळासाहेब जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.