वैजापूर येथे युवासेनेची आढावा बैठक

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-युवासेना कोअर कमिटी सदस्य सिध्देश धाऊसकर यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेची आढावा बैठक रविवारी (ता.08) येथे पार पडली.

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र देवकर, युवासेनेचे सरचिटणीस धर्मराज दानवे, शिवसेना उपतालुकाप्रमुख मोहन पाटील साळुंके युवासेना तालुकाप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, युवानेते प्रशांत पाटील शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील न्हावले, उपजिल्हाप्रमुख अक्षय पाटील साठे, शहरप्रमुख राहुल साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत माजी आमदार चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे,युवासेनेचे ऋषीकेश धाऊसकर ऋषीकेश खैरे आदींनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख प्रसाद पवार, ऋषिकेश राजपुत, भगवान पगार, ज्ञानेश्वर कटारे, राजेंद्र रहाणे, विनोद आगळे, अमोल पाटील बावचे, लखन त्रिभुवन, सम्राट राजपुत, अक्षय बुट्टे, कृष्णा पाटील धारबळे, राज पवार, रविंद्र तांबे, उज्वल कदम, कार्तिक वाघ, राहुल सोनवणे, निलेश बावीस्कर, ओंकार देसाई, रामेश्वर गोरे, रुद्रा सदगिर, ईरफान शेख यांच्यासह युवासेनेतील उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख मोठ्यासंख्येने उपस्थित होते.