वैजापूर पालिकेच्यावतीने “स्वछता के 2 रंग” अंतर्गत घनकचराचे स्रोतावरच विलगीकरण मोहीम

वैजापूर,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर नगरपालिकेच्यावतीने शहरात 17 ते 22 ऑक्टोबर 2022 दरम्यान “स्वछता के 2 रंग” अंतर्गत घनकचराचे स्रोतावरच विलगीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअन्तर्गत मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील सुंदर गणपती मंदिर परिसरातील महिला बचत गटाला ओला कचरा व सूखा कचरा याविषयी जनजागृती करण्यात आली.

पालिकेचे मुख्याधिकारी बी.यू. बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत व समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन यांच्या उपस्थितीत महिला बचत गटाच्या सदस्यांना घनकचरा विलगीकरणाचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.