वैजापूर येथे क्रांती नवरात्र उत्सव समितीतर्फे कोजागिरीदिनी फॅन्सी ड्रेस स्पर्धा

वैजापूर,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील विविध भागांतील लहान मुलांनी आपल्या कला,गुणांच्या माध्यमातून आपली विविध कला व कौशल्ये कोजागिरी पौर्णिमा दिनी रविवारी (ता.09) रोजी क्रांती नवरात्र उत्सव समितीच्या कोजागिरी उत्सव कार्यक्रमात सादर करून उपस्थित नागरीकांची प्रचंड पसंती मिळविली.

या सर्व गुणवान स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, काशिनाथ भावसार,जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, क्रांती नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष किरण,व्यवहारे, दिनेश राजपूत, राहुल कुंदे, प्रेम राजपूत यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पदक देण्यात आले. प्रशांत सोमवंशी, गणेश पवार, गणेश राजपूत, मयूर राजपूत, दीपक बोर्डे, अमृत शिंदे, गणेश अनर्थे, जवाहर कोठारी, प्रकाश माळी, विजय देशमुख, नगरसेविका जयश्री राजपूत, युवराज चेळेकर, सोमु सोमवंशी, अमोल बोरनारे,सम्राट राजपूत, ऋषि अनर्थे भीमा साखरे,यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. छोट्या मुलां-मुलींचे पालक ही आवर्जून उपस्थित होते. सूत्र संचलन अमृत शिंदे यांनी केले तर आभार प्रेम राजपूत यांनी मानले.