शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष वैजापूर तालुकाप्रमुखपदी बाळासाहेब जाधव

वैजापूर ,२५ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात करण्यात आल्या असून शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष वैजापूर तालुकाप्रमुखपदी शिवसेनेचे डोंगरथडी भागातील कार्यकर्ते बाळासाहेब भागीनाथराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब जाधव हे तालुक्यातील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर व प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांची 

शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष वैजापूर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, शिवसेनेचे शहरप्रमुख पारस घाटे,संजय बोरणारे, कमलेश आंबेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल मा.नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, रहीम खान, उपतालुकाप्रमुख महेश बुणगे, युवासेनेचे अमीर अली, श्रीराम गायकवाड, संजू तांदळे आदींनी अभिनंदन केले आहे.