छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नांतील  देश घडवा – पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे वितरण 

वैजापूर, २ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- रयतेचे जाणते राजे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नांचा देश घडविण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी समाजात विधायक व रचनात्मक कार्य करून येणाऱ्या नव पिढीला व नव तरुणांसमोर राजेंचे कार्य, कतृत्व, व चारित्र्य चे पाठ गिरवावे व सत्यम,शिवम,सुदरम देश घडवावा असे आवाहन वैजापूरचे पोलिस निरीक्षक साम्राटसिंह राजपूत यांनी केले.

येथील पंचायत समिती सभागृहात जिजाऊ बहुउद्देशी सेवाभावी संस्थेतर्फे राज्यातील 51 जणांना मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती संजय निकम,शिव व्याख्याते शिवश्री सतीश उखर्डे, चंदा लहामंगे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिह राजपूत यांची उपस्थिती होती‌. प्रारंभी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक आयोजक सूर्यकांत रामदास पाटील मोटे यानी केले. ते म्हणाले कि राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यकरून समाजसेवा व्हावी हा उद्धेश आहे असे सांगितले. संजय पाटील निकम,शिवश्री सतीश उखर्डे , लहामगे व गायत्री मोती वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले. सूर्यकांत मोटे यांनी आभार मानले. केदार मोटे, श्रध्दा मोटे, मोती वाघ, साहेबराव पडवळ, दीपक त्रिभुवन
संजय काटकर यांनी सहभाग नोंदविला.