कृषि क्षेत्रातील रोजगार संधी

भारतामध्ये आजही शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण 70% जनतेची उपजिविका ही शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अलिकडेच जागतिकीकरणामुळे शेती हा व्यवसाय करणे प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीची आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक ठरते. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जैवतंत्रज्ञान, हरितगृह, ठिबक व तुषार सिंचन, पड व भाजीपाला प्रक्रिया यांत्रिकी शेती बाबींचा अंतर्भाव होतो, हे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी शिक्षित मनुष्यबळाची गरज असते. ही गरज लक्षात घेउनच केंद्र तथा राज्य शासनाने प्रत्येक राज्यात कृषि महाविद्यालये जिल्हा तसेच तालुका पातळीवर सुरु करून शेतक-यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
शेती हा मागील काही वर्षात तोटयाचा उद्योग झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढून त्याचा विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर होताना दिसत आहे. यासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण व बळ देवुन उभे करावे लागेल. शेतमाल विक्रीपश्चात प्रक्रिया, बाजार व्यवस्था व त्यासंलग्न अनेक घटक आहेत ज्यात अनेक उद्योगांची संधी आहेत. या संधीपैकी काही महत्वाच्या संधी खालील प्रमाणे आहेत
1. दर्जेदार कृषि उत्पादने
शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला प्रक्रियेसाठी उत्तम प्रतिचा शेतमाल लागतो. गुड अॅग्रीकल्चरल प्रैक्टिस या आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार शेतीमाल उत्पादन करणे आणि त्यातून स्थानिक व निर्यात बाजारपेठ यांच्याशी जोडणे या मूल्य साखळीतील सर्वात पहिल्या घटकात ग्रामीण युवकांना गटशेती उद्योगातून चांगली संधी निर्माण होऊ शकते. दर्जेदार उत्पादन करण्यासाठी पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. या व्यवस्थापनादरम्यान निविष्ठा (शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बियाणे वगैरे), सिंचन, पिकांची मशागत, अनद्रव्य व्यवस्थापन, किडरोग व्यवस्थापन, कृषि अवजारे केंद्र अशा प्रकाराच्या संलग्न व्यवसायामध्ये अनेक सेवा संधी दडलेल्या आहेत.
2. कृषियंत्र उद्योग
शेतीकामासाठी मजुरांची उपलब्धता कमी होत असल्यामुळे शेती आता यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे. बाजारामध्ये अनेक प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. भाडेतत्वावर यंत्रपुरवठा हा एक चांगला व्यवसाय म्हणून गेल्या काही काळात पुढे आला आहे. ट्रॅक्टर संचलित अवजारे व यंत्रे यांची बैंक तयार करून शेतक-यांच्या गरजेनुसार त्यांना भाडेतत्वावर पुरवठा करणे, हा व्यवसाय अनेक युवकांना चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळवून देवू शकतो. यामध्ये शेतीची मशागत, पेरणी, आंतरमशागत, खतपेरणी, पिकसंरक्षण तसेच पिक काढणी अशा प्रकारच्या कामासाठी यंत्राचा उपयोग होवू शकतो. 
3. काढणी पश्चात उद्योग
शेतीमाल उत्पादन झाल्यानंतर बाजारात जाण्यापुर्वी प्राथमिक प्रक्रिया करून जर शेतीमाल बाजारात गेला तर त्याला साधारणतः 20 ते 25 % जास्त भाव मिळू शकतो. यासाठी ग्रामीण भागात युवकांसाठी प्राथमिक प्रक्रिया करण्याची काही यंत्रे विकत घेवून शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंग करून शेतमाल बाजारात पाठविणे अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी चांगला उद्योग उभा राहू शकतो.
4. शेतकरी उत्पादन कंपनी
भारत सरकारच्या येजनेतून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे जाळे देशभर उभे केले जात आहे. ग्रामीण भागात उत्पादक शेतक-यांनी त्यांचा माल सामूदायिकरित्या एकचीत करून शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया केल्यामुळे तसेच बाजारपेठ सोडुन इतरत्र विक्री केल्यामुळे शेतमालाला वाजवी मोबदला मिळण्यास मदत होते. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी उत्पादन कंपन्या कार्यरत व पंजीकृत झाल्या आहेत, देशपातळीवर दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उधिष्ट आहे. त्यामध्ये ग्रामीण युवक व शेतक-यांनी एकत्रित येवून कंपनी रजिस्टर केली, तर ती कंपनी कशी चालवायची याबाबत मार्गदर्शन व फायदा कमविण्यासाठी लागणारे प्रशिक्षण त्यांना मिळाल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांचा माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.
5. शेती क्षेत्राशी संलग्न व्यवसाय
शेती क्षेत्राशी संलग्न असे अनेक व्यवसाय आहेत. ट्रॅक्टर व अवजारे देखभाल दुरुस्ती, कृषि अवजारांची सेवाकेंद्र, हवामान अंदाज व शेती सल्ला केंद्र अशा प्रकारचे सेवा उद्योग युवक स्वतंत्रपणे किंवा समविचारी गट तयार करून चांगल्या प्रकारे करू शकतात.
6. वाहतूक व व्यवसाय 
शेतीमाल, फळे व भाज्या काढणीनंतर बाजारापर्यंत पोहोचविणे यासाठी वाहतूक व्यवसाय करण्याची संधी अनेक युवकांना मिळू शकते. नाशवंत फळे व भाज्या योग्य प्रकारे शेतावरती स्वच्छ करून, प्रतवारी करून, चांगल्या प्रकारचे पॅकेजिंग करून व वाहनामध्ये योग्य रितीने लोडिंग करून बाजारापर्यंत सुरक्षितपणे पाठविण्यासाठी कौशल्य असणा-या युवकांना यामधून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
7. शेतीमाल प्रक्रिया उद्योग
उत्पादनानंतर लहान लहान प्रक्रिया उद्योग करण्यासाठी ग्रामीण युवकांना फार मोठया संधी आहेत. शहरी भागामध्ये काम करणा-या सर्व क्षेत्रातील लोकांची कार्यशक्ती वाढली असून त्यांच्याकडे वेळही कमी असतो. या लोकांचा प्रक्रियायुक्त रेडी टू कूक व रेडी टू इट अशा प्रकारच्या अवाकडे कल वाढला आहे. ग्रामीण भागामध्ये ज्याठिकाणी तो माल उत्पादित होतो, त्याचठिकाणी अशा प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण झाल्यास तेच अन्न चांगल्या प्रकारचे पॅकिंग करून ब्रेडिंग करून बाजारात स्वस्त दरामध्ये ग्राहकांना मिळू शकेल. हे करण्यासाठी ग्रामीण लोकांना याविषयाचे तंत्रज्ञान व्यवस्थपन व आर्थिक नियोजन या विषयी प्रशिक्षित करून बँकिंग क्षेत्राच्या मदतीने लघु किंवा मध्यम उद्योग उभारण्याची संधी मोठया प्रमाणात उपलब्ध आहे.
8. ट्रेडिंग व मार्केटिंग
शेतीमालाचा व्यापार व विक्री यामध्ये अनेक संधी दडलेल्या आहेत. उदा. उत्पादक शेतकन्यांकडून शेतमाल विकत घेवून त्याची चांगल्या प्रकारे स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग व ग्रेडिंग करून 1 ते 5 किलोच्या पॅकमध्ये घरपोच मिळेल अशा प्रकारच्या उद्योगाला फार मोठा वाद येत्या काळात आहे. उसे प्रयोग अनेक सुशिक्षित युवकांना अॅप तयार करून ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून सुरु केलेले दिसतात. अशाच प्रकारचा उद्योग करण्याची संधी आणि यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
9. स्टार्टअप
अलीकडे शेतीव्यवसायाच्या मुल्यसाखळीमध्ये संधी शोधून नवीन तंत्रज्ञान शोधून अनेक स्टार्टअप कंपन्यांची स्थापना भारतातील शेती क्षेत्रात होत आहे. या क्षेत्रामध्ये सेवा पुरवणे, ट्रेडिंग करणे, विक्री व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, तंत्रज्ञान निर्मिती. शेतीतील कार्यक्षमता वाढवणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेंसरचा वापर करून शेतीकामाची सिंचनाची तसेच शेतीतील इतर सर्व घडामोडीच्या संदर्भाने स्टार्टअप सुरु झाले आहे. या स्टार्टपांना केंद्र सरकार तसेच खासगी फडिंग एजन्सीच्या मार्फत चालना दिली जाते. मागील काही वर्षात शेती क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या नवीन कंपन्या उभ्या करण्यात तरुणांचा कल वाढत असून यामध्ये अनेक रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत.


डॉ. दत्तात्रय कुकाजी शेळके

संचालक छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित  कृषि महाविद्यालय
कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर

संपर्क क्रमांक : ९९ २१ ५५१ ०९९