वैजापूरमध्ये आढळला अत्यंत दुर्मिळ असा साप

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  वैजापूरच्या इतिहासात प्रथमच गजरा साप सापडला. मृदू साप Smooth Snake असं त्याचं नाव. वैजापूर येथील पंडीत काका नगर.येथे तुकाराम गायके यांचा घराच्या पायरी जवळ त्यांना हा साप दिसला. त्यानी तात्काळ महाराष्ट्र सेना सर्प मित्र आघाडी राज्य कार्याध्यक्ष तथा वन्यजीव रक्षक अमित अनर्थे यांना फोन केला. अमित अनर्थे आल्यावर त्यांनी साप रेस्क्यू करून त्याची माहिती नागरिकांना सांगितली. 

अमित अनर्थे म्हणाले, हा साप मी पहिल्याच वेळी रेस्क्यू करत आहे. मी आतापर्यत पाच हजारच्यावर साप पकडले पण त्यात हा माझा पहिलाच साप. हा साप बिन विषारी खूप लाजाळू व शांत असतो. याची लांबी सरासरी दोन फूट.अधिकतम लांबी तीन फूट असते. महाराष्ट्रात काही ठिकाणीच हा साप सापडल्याचा नोंदी आहे. कोरड जमीन विटाच्या ढि गात हा आढळतो. छोटे उंदीर, सापसूरळी, पाली हे त्याचे खाद्य. उन्हाळी महिन्यात मादी ६ पर्यत अंडी देते. मान्सून पूर्व ते मध्य मान्सून दरम्यान दिसतात.असे त्यांनी सांगीतले. तर अत्यंत सुंदर असा हा साप पकडून त्यानी त्याला जवळील जंगलात सोडले.

कोणीही साप मारू नका.आपल्या जवळील सर्पमित्राला फोन करा.सापाला वाचवा, पर्यावरण वाचवा असे आवाहन अमित अनर्थे  यांनी केले.