वैजापूर येथे संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

वैजापूर, ८ डिसेंबर / प्रतिनिधी :- संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांना जयंती निमित्त गुरुवारी (ता.08) येथे अभिवादन करण्यात आले. येथील संताजी व्यापारी संकुलात शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन संताजी महाराज यांना अभिवादन केले. 

नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी यांनी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सीताराम शेठ व्यवहारे, सचिव आर.पी. क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,भगवान व्यवहारे, पंढरीनाथ शेलार, केशव आंबेकर, रामदास रत्नपारखी, कमलेश आंबेकर, अरुणआंबेकर, दत्ता आंबेकर, विनोद महाले, कृष्णा क्षीरसागर, विनोद महाले, बबन क्षीरसागर यांनीही पुष्प अर्पण केले. याप्रसंगी शहरातील तिळवण तेली समाजातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.