समाजातील प्रत्येकाने नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे – परमानंदगिरी महाराज

संत जनार्दन स्वामी यांच्या 33 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वैजापुरात प्रवचन

वैजापूर, ८ डिसेंबर / प्रतिनिधी :- भारतीय संस्कृतीने नेहमी स्त्री शक्तीचा सन्मान केलेला आहे, नारी शक्तीचा जेथे सन्मान होतो तेथे देवी-देवताचे अस्तित्व असते म्हणून समाजातील प्रत्येकाने नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे. जेथे मातृशक्तीचा अवमान होतो तेथे सदा न कदा दुःखाची छाया असते असे अमृतवचन भांगसी माता गड-शरणापूरचे मठाधिपती श्री.श्री.1008 महामंडलेश्वर  स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांनी बुधवारी (ता.07 ) वैजापूर येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या 33 व्या पुण्यस्मरणनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले की आज समाज मन कमालीची संकुचित होत आहेत. समाजमनात विकार व व्यसन घर करून आहेत.अशा समयी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा संदेश मानवसेवा करण्याचा व समाज मन जोडून विधायक दृष्टी समाजाला देण्यासाठी धार्मिक कार्य व संतांचे प्रबोधन उपयुक्त ठरतात. याप्रसंगी प.पू.दत्तगिरीजी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. या प्रसंगी ज्ञानानंदगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, राजेंद्र पाटील साळुंके, डॉ. सुभाष भोपळे, डॉ. बाबासाहेब इंगळे, रमेश पाटील  हडोळे, राजू जोगीलाल राजपूत, भावलाल सोमासे, सोन्याबापू गावडे, सर्वश्री वाघ, पुतळे, मोटे पाटील, अरविंद साळुंके, दाणे पाटील, शंकर मुळे, संगीता पुतळे, मंदा गायकवाड, आशा महाजन, मोटेताई यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.