द्वेष भावनेतून हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा – वंचित आघाडीचा वैजापुरात आक्रोश मोर्चा

वैजापूर ,१९ जून/ प्रतिनिधी :-पाच जणांची वेगवेगळ्या ठिकाणी द्वेषभावनेतून निर्घृण हत्या करण्यात आली. राज्य सरकारने या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करुन दोषावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी (ता.19) सकाळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी समाज बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. 

आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम जाधव, शहराध्यक्ष जाकीर पठाण, अंकुश पठारे, किरण पवार, प्रवीण शिंदे, पिंटू भोसले, राजवीर त्रिभुवन, राहुल साळवे, सरफराज शेख, अरुण सोनवणे, फैय्याज सौदागर , प्रमोद सातुरे, रंभाजी आल्हाट, अरुण साळवे , दिगंबर साळवे यांच्या सहभागातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून दोषींवर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. जितेंद्र शिरसाठ, गौतम जाधव, नामदेव त्रिभुवन, अमोल दिवे,गौरव कसबे मनोज पठारे, बाबासाहेब वाघ, साहेबराव पडवळ, यशवंत पडवळ राजेंद्र पडवळ, लक्ष्मण धनेश्वर यांच्यासह शहर व ग्रामीण भागातून मोठ्यासंख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, शहरप्रमुख श्रीकांत जाधव यांनी पाठिंबा दिला.