वैजापूर- गंगापूर रस्त्यावर लोडिंग गाडीला आग ; गाडीतून उडी मारल्याने चालक बचावला

वैजापूर ,१८ जून/ प्रतिनिधी :-  वैजापूर – गंगापूर रस्त्यावर असलेल्या जिनिंग फॅक्टरी जवळ ‘छोटा हत्ती’ लोडिंग गाडीने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीच्या चालकाने उडी मारून आपला जीव वाचविला.

ही लोडिंग गाडी गंगापूरच्या दिशेने जात असताना ही आग लागली. गाडी चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी टाकली ज्या मुळे थोडक्यात या ड्रायव्हरचे प्राण वाचले. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे