सैन्यदलातील जवान संतोष जाधव यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय सैन्यात कार्यरत असलेले वैजापूर तालुक्यातील बल्लाळी सागज येथील संतोष बाबूराव जाधव हे आपल्या गावी सुट्टीवर आलेले असतांना अचानक ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाले. कालच त्यांच्या पत्नीचे बाळंतपण होऊन कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते परंतू नियतीला काही वेगळेच मान्य होते. शुक्रवारी (ता.13) सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे निधन झाले.

जाधव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी त्यांना चाळीसगांव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. शनिवारी (ता.14) सकाळी 10.30 वाजता बल्लाळी सागज ता.वैजापूर या मूळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.