तित्तरखेडा येथे तीन आदिवासी कुटुंबाचे घर आगीत भस्मसात ; आ.बोरणारे यांच्याकडून संसारोपयोगी साहित्य व आर्थिक मदत

वैजापूर ,१८ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील तित्तरखेडा येथे हातावर काम करून उदरनिर्वाह करीत असलेल्या आदिवासी कुटुंबातील भाऊसाहेब सुकाराम मोरे यांच्यासह अन्य दोघांच्या यांच्या राहत्या घराला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच आ.रमेश बोरणारे यांनी तित्तरखेडा येथे जाऊन आगीमुळे नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबातील भाऊसाहेब तुकाराम मोरे, भावराव मोरे व ज्ञानेश्वर मोरे यांची भेट घेतली व मोरे कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य व आर्थिक मदत देऊन त्यांना धीर दिला व शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, भरत पाटील साळुंके, गोरख पाटील झाल्टे, चंद्रशेखर पाटील साळुंके, पोलीस पाटील योगेश  साळुंके, अजय साळुंके, प्रमोद साळुंके, उपसरपंच बाळू महाराज, आप्पासाहेब साळुंके, प्रकाश साळुंके, नानासाहेब साळुंके, रावसाहेब साळुंके, सागर साळुंके, संजय साळुंके, काकासाहेब साळुंके, दत्तू नाना साळुंके, बाबासाहेब निकम आदी उपस्थित होते.