वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे दीड कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,१८ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे शसनाच्या विविध योजनेतून विकास कामांसाठी 1 कोटी 46 लक्ष 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून  मंजूर असलेल्या जलजीवन योजनेअंतर्गत गावात नळजोडणी व शादीखाना बांधकामांचे भूमिपूजन रविवारी आ.रमेश बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, वैजापूर बाजार समितीचे.सभापती रामहरीबापू जाधव, उपसभापती शिवकन्या पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, भाजप तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव यांची यावेळी भाषणे झाली. राज्य सरकारकडून तालुक्यातील विकास कामासाठी मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करून आणल्याचे आ.बोरणारे यांनी सांगितले.

कार्यक्रमास शिवसेनेचे शहरप्रमुख पारस घाटे, नगरसेवक दशरथ बनकर, दत्तू पाटील, युवासेना जिल्हासमन्वयक अमीर अली, बाजार समितीचे  संचालक कल्याण पाटील जगताप, गोरख आहेर, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, रजनीकांत नजन, बद्रीनाथ गायकवाड, उपतालुकाप्रमुख प्रकाश मतसागर, विभागप्रमुख राजेंद्र चव्हाण, उपकार्यकारी अभियंता कोयलवार साहेब, उपविभागप्रमुख पांडुरंग जगदाळे, खंडाळा शहरप्रमुख विजय मगर,माजी जिल्हापरिषद सदस्य सूरज नाना पवार, माजी उपसभापती मधुकर पाटील पवार, सरपंच कौशाबाई थोरात, उत्तमराव पवार, उपसरपंच हाजी महमद भाई, चेअरमन कैलास पवार, नगरसेवक गणेश खैरे, वसंत त्रिभुवन, कनिष्ठ अभियंता किरण आवारे, निखिल वाणी, दिलीप जाधव, अशोक  घायवट, रंजक पा तांबे, आप्पासाहेब आव्हाळे, युवासेना उपतालुकाप्रमुख संदीप पवार, रामेश्वर पाटोळे, चांगदेव पवार, निलेश जगधने, संतोष बंगाळ, बाबू खासाब, रामभाऊ त्रिभुवन, विलास पवार, मोबिन खान, शिवाजी जाधव, रहिमभाई बागवान, नंदु दादा पवार, नानासाहेब पवार, मन्सूब पा मगर, विजय पा मगर, सादिक भाई, रमेश बागुल, मिलिंद बागुल, दिनकर मगर, दिनेश थोरात, नितीन बागुल, आक्रम पठाण, रमेश सोनवणे, मुकेश पवार, संतोष जाधव, संदीप पवार, बाबा भाई.सलीम भाई शहा यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.