वैजापूर येथे काँग्रेस पक्षातर्फे डिजीटल सदस्य नोंदणी आढावा बैठक

वैजापूर,९ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी ची डिजीटल सदस्य नोंदणी आढावा बैठक ‌9 एप्रिल रोजी सकाळी मर्चंट बँक सभागृह वैजापूर येथे झाली.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याणराव काळे, माजी आमदार सुभाष झांबड, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. प्रास्तविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांनी केले. शहराध्यअक्ष काझी मलीक सुनिल कुंदे, दिगंबर वाघचौरे, एस.ङी.पडवळ, सुदामभाऊ छानवाल,बाबासाहेब गायकवाड ,संदिप देवकर,सुशिल आसर, मधुकरराव साळुंके, लक्ष्मण पवार,भास्कर मतसागर ,राजेंद्र मगर, सागर डंबीर, निलेश लाडवाणी, अदिनाथ गुजर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.