लघू उद्योग बँक आणि प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेमध्ये सामंजस्य करार

जालना,७ एप्रिल / प्रतिनिधी :- केंद्र सरकारच्या भारतीय लघू उद्योग विकास बँक विभाग आणि येथील प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेमध्ये काल मंगळवारी दि. 5 एप्रिल रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार केंद्राच्या एमएसएमई या योजनेमधील विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व लाभार्थ्यांना त्याचा फायदा देण्यासाठी हा करार नामा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या करारनाम्यासाठी गेली दोन वर्षापासून बँकेने प्रयत्न सुरु ठेवले होते. त्या दृष्टीने प्रत्यक्ष भेटी आणि पत्रव्यवहाराव्दारे हा करारनामा बँकेसाठी किती महत्वाचा आहे, तसेच त्यामुळे सहकारी बँकेच्या ग्राहकांना त्याचा लाभ किती मोठ्या प्रमाणावर मिळेल हे पटवून दिले होते.  प्रियदर्शनी बँक ही सतत मायक्रो कर्ज, छोटे कर्ज देण्यास प्राधान्य देत आहे, त्यामुळे प्रियदर्शनी बँकेचा ग्राहक वर्ग हा छोटे व्यवसायीक आहे.

No photo description available.
माजी आमदार अ‍ॅड. विलासबापू खरात

सदर व्यवसायास शासनाचे ही पाठबळ मिळावे म्हणून बँकचे संस्थापक चेअरमन माजी आमदार अ‍ॅड. विलासबापू खरात यांच्या संकलपनेतून सदर करारनामा घडवून आणला आहे. सदर करारनमा करताना केद्रशासनाच्या विभागाने विविध तपासण्या करुन बँक सक्षमतेचे नॉर्मस पुर्ण करत असल्यानेच सदर सुविधा पुरविण्याचा परवाना बँकेस दिला आहे. सीजीटीएमएसई अंतर्गत हि योजना असून बँक पुढील काळात सदर बाबतीत ग्राहकास प्रबोधन करेल, होणारे फायदयाबाबत माहिती देईल. सदर करार करणारी प्रियदर्शनी बँक सहकार क्षेत्रातील पहिली नागरी सहकारी बँक ठरली आहे. या करारनाम्याबद्दल बँकेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. विलासबापू खरात यांनी चेअरमन सीए नितीन तोतला, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी आणि व्यवस्थापक प्रतिक्षा ढेकेकर यांचे अभिनंदन केले आहे.