विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी करियर कट्टा हा दिशादर्शक-यशवंत शितोळे

जालना,७ एप्रिल / प्रतिनिधी :-आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी करियर कट्टा हा दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.

येथील जे.ई.एस.महाविद्यालयाच्या केंद्रीय सभागृहात  महाराष्ट्र  राज्य उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि जे.ई.एस.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्ट्याचे बदलते स्वरूप व नॅक मूल्यांकनामध्ये होणारा फायदा या विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.एस.बी.बजाज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय समन्वयक डॉ. राजेंद्र उढाण जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.  

पुढे बोलताना शितोळे म्हणाले की, करिअर कट्ट्याच्या उपक्रमाने विद्यार्थ्यांचे भवितव्य मॉडेल कौशल्य विकास इंक्युबेशन सेंटर, सायबर सिक्युरिटी, एमपीएससी फाउंडेशन, इंग्लिश स्पोकन तसेच विविध कौशल्य विकास उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी गुणकौशल्य विकसित करता येतील. असेही ते यावेळी म्हणाले. करियर कट्टा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तर फायदा होईल, त्याचप्रमाणे महाविद्यालयांना मूल्यांकनासाठीदेखील याचा फायदा होईल. एका वर्षात या उपक्रमांतर्गत सात विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ज्या महाविद्यालयांना खेळाचे मैदान उपलब्ध आहेत. अशा महाविद्यालयात पोलीस भरती प्रशिक्षण सुरू करणार असल्याची माहिती श्री. शितोळे यांनी यावेळी दिली.

मॉडेल स्किल डेव्हलपमेंट आणि आर्ट कॉमर्स सायन्स या सर्व फॅकल्टी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखे अनेक कोर्सेस आपण घेऊ शकतो तसेच ॲडव्हान्स कोर्सेस आपण महाविद्यालयीन स्तरावर सुरू करू शकतो. असे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या भौतिक सुविधेमुळे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

            अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.बजाज म्हणाले की, करियर कट्टयातील  विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी फायदा होणार असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी देखील करिअर कट्टा महत्त्वपूर्ण आहे.

            याप्रसंगी डॉ.सूर्यकांत चौगुले डॉ.नागनाथ शेवाळे, प्रा. राम लहाने, प्रा.सतीश लोंढे, प्रा.किशोर बीरकायलू आणि जालना जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, करियर कट्ट्याचे महाविद्यालयीन समन्वयक, तालुका समन्वयक, आयक्यूएसी समन्वयक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वसंत पवार यांनी केले तर डॉ.राजेंद्र मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  

जालना.

आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी करियर कट्टा हा दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.