स्वातंत्र्यवीर सावरकर भवनास निधी कमी पडू दिला जाणार नाही – आमदार कैलास गोरंट्याल

जालना,२६सप्टेंबर/प्रतिनिधी :-भाग्यनगर येथील एस.एन.कुलकर्णी यांनी दान दिलेल्या जागेत स्वा.सावरकर भवनाचे नाम फलकाचे उद्घाटन आ.कैलास  गोरंट्याल  यांच्या हस्ते आज मंगळवारी करण्यात आले.

यावेळी आ. कैलास  गोरंट्याल यांनी कुलकर्णी काकांनी आयुष्यात कमावलेली संपत्ती थोर अश्या स्वातंत्र्यवीराच्या नावाने दान करीत आहे ही  फार मोठी बाब आहे. त्यांनी दान केलेल्या कार्यास सावरकर सदनास निधी कमी पडू देणार अशी ग्वाही आमदारांनी  दिली.
यावेळी प्रा.एस.व्ही.देशपांडे, कल्याणराव देशपांडे,रमेश देहेडकर, डॉ.संजय रुईखेडकर, सिध्दीविनायक मुळे,रविंद्र देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास खेरुडकर,श्रीकांत शेलगावकर, अनिल शेलगावकर, दिलीप देशपांडे, उग्रसेन महामुनी,जी. ए.कुलकर्णी,आदी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कल्याणराव देशपांडे यांनी केले.