जालन्यात शनिवारपासून उडान महाएक्स्पो: खरेदीचा लाभ घ्यावा – कीर्ती अग्रवाल

जालना ,३ मार्च / प्रतिनिधी :- उडान ग्रुप तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील गुरू गणेश भवन येथे 05 व 06 मार्च रोजी महा एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून जालनेकरांना  खरेदीसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. 
महाएक्स्पोच्या आयोजनाबाबत अधिक माहिती देताना  उडानच्या संस्थापिका कीर्ती  अग्रवाल यांनी सांगितले की, शनिवारी  सकाळी 10.00 वा.  नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते सदर महाएक्स्पोचे  उद्दघाटन होईल.

Displaying 1646316435957.jpg
उडानच्या संस्थापिका कीर्ती  अग्रवाल

शनिवार व रविवार सकाळी 10 ते राञी 10 या वेळेत होणाऱ्या महाएक्स्पोत  सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू ,कपडे, साडी, ड्रेसेस, सौंदर्यप्रसाधने, केक, सजावट साहित्य, खाद्यपदार्थ , गिफ्ट कार्ड ,ज्वेलरी ,कुकिंग क्लासेस ,देवांची वस्ञे,केसांसाठी लागणारे तेल,शॅम्पू, घरस्वच्छता, पर्स,बास्केट, पादञाणे, सेंद्रिय गुळ, अशा उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.असे कीर्ती अग्रवाल यांनी नमूद केले. महिलांसह जालनेकरांना सर्व काही एकाच ठिकाणी खरेदी करण्याची  विनाशुल्क संधी यानिमित्ताने उडान ग्रुप तर्फे उपलब्ध करून देण्यात आली असून महिलांसह  जालनेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे  आवाहन संस्थापिका कीर्ती अग्रवाल यांच्या सह उडान ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.