‘शिवगर्जना’ या संपर्क मोहीमअंतर्गत शिरसगाव येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा शेतकऱ्यांशी संवाद  व विकास कामाचे भूमीपूजन

वैजापूर ,१६ जून/ प्रतिनिधी :- शिवगर्जना संपर्क अभियानांतर्गत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आज तालुक्यातील शिरसगांव येथे शेतकऱ्यांशी संवाद  साधून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख अँड.आसाराम पाटील रोठे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेना महिला आघाडीच्या प्रतिभाताई जगताप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, तालुकासंघटक मनोज गायके, युवासेना तालुकाप्रमुख विठ्ठल डमाळे, मोहन गायकवाड,  सिताराम भराड,भीमाशंकर तांबे, लताताई पगारे उपजिल्हा संघटक महिला आघाडी लताताई पगारे, तालुका संघटक वर्षाताई जाधव, पोपटराव धात्रक, अमोल पाटील मलिक, बाबासाहेब डांगे, विजय वराडे, केशव मलिक, अशोक डांगे, रामू काका वराडे, गोविंद मलिक, रमेश मलिक, नारायण मलिक, अनिल डांगे, राजू पाटील दुशिंग, गोकुळ मलिक, रामा भवर, दादाभाऊ वायळ, रामेश्वर पाटील झिने, सोन्याभाऊ धात्रक, गोकुळ पाटील नेहे, रामेश्वर दादा नेहे यांच्यासह महालगांव सर्कलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.