वैजापूरच्या श्रीयोग पोंदे याची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

वैजापूर, ९ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर येथील श्रीयोग शैलेश पोंदे हा शालेय वेटलिफ्टिंग जिल्हा व विभागात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी  पात्र ठरला आहे. सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी ग्लोबल स्कूल वैजापूरचे अध्यक्ष अँड. देवदत्त पवार, प्रिंसिपल शिल्पा वर्मा, स्पोर्ट टिचर भाऊसाहेब खरात, क्रांती फिटनेस क्लबचे संस्थापक दिनेश राजपूत, ट्रिपल एस. फिटनेस क्लबचे संस्थापक सोनू राजपूत, आर्य फिटनेस क्लब औरंगाबादचे संस्थापक राहुल साळवे, ऋषभ जवकर बीड, जिम ट्रेनर गुड्डू सर यांचे मोलाचे मार्गदर्शन श्रीयोग यास मिळाले.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्रीयोग याचे मा. नगराध्यक्ष साबेर खान, विजय वेद, दिनेश राजपूत, गौरव दोडे, सोमु सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.