दार,उघड ऊद्धवा,दार उघड भाविक, भक्तांचे मुख्यमंत्र्यांना साकडे !

औरंगाबाद ​,दि.29 ​ऑगस्ट ​कोरोना माहामारीच्या  प्रादुर्भावातुन सर्व सामान्य जनतेचे,जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रा मधील  मॉल, मांस, मटन विक्री दुकाने,वाईन शॉप,देशी दारूची दुकाने,पुनश्च हरिओम या नावाखाली सर्व काही चालू केले, माहाराष्ट्र ही संताची भूमी असलेल्या,महाराष्ट्रात हरि (देवा)ला, बंदिस्त करून ठेवले ,आहे. साधु,संताच्या भूमीत मात्र,महाराष्ट्रात मद्य विक्री मुबलक सुरू आहे. आणि भजन,किर्तन, पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहे. “भाविक भक्तांना जेल गुन्हेगारांना बेल” या पद्धतीने ठाकरे सरकारचा कारभार चालू आहे. महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे. केंद्र सरकारने 4 जून 2020 रोजी नियमावली सह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहे.
मात्र महाराष्ट्र राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी व शर्ती सह सर्व देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होता आहे. मात्र पुनश्च हरिओम म्हणून हरि लाच बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी च्या निद्रिस्त अवस्थेत गेले आहे. या निद्रस्त माहाविकास आघाडी  सरकारला जागे, करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता गजानन माहाराज मंदिर येथे व शहरातील प्रमुख,देवस्थाने, धार्मिक स्थळासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या घंटानाद आंदोलना मध्ये भाजप ,व भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर,खा.डॉ.भागवत कराड,आ.अतुल सावे,गुरूद्वारा मुख्य ग्रंथी,पुजनिय खडकसिंग .प्रदेश कार्यकारणी सदस्य व मिडिया पॅनलीस्ट प्रविण घुगे,मिडिया पॅनलीस्ट शिरीष बोराळकर, जालिंदर शेंडगे, यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले, या वेळी,प्रदेश महिला मोर्च सरचिटणिस सविता कुलकर्णी,माधुरी अदवंत,राजेश मेहता, दयाराम बसयै , संजय खनाळे,प्रा.गोविद केंद्रे,लक्ष्मीकांत थेटे,संजय बोराडे, बालाजी मुंडे,अशोक दामले,मंगलमुर्ती शास्त्री,विवेक राठोड,नविन गिरी,डॉ.राम बुधवंत,आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *