जांबरखेडा येथे शेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील जांबरखेडा शिवारात बुधवारी घडली .

किशोर बाळू लंबे (22 )रा. जांबरखेडा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृतदेह दुपारी चार वाजता तळ्यात तरंगताना  दिसला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी मृतदेह पाण्या बाहेर काढला. देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले .याप्रकरणी शिवुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अविनाश भास्कर, विशाल पैठणकर हे करत आहेत. लंबे यांच्या पश्चात चार बहिणी, आई ,वडील असा परिवार आहे.