वैजापूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात घसरण

Onion daily rate in Vaijpur | Onion market price in Vaijpur today with 1  varieties | Daily Commodity Prices

वैजापूर ,१७ मे /प्रतिनिधी ;-सलग एक महिन्या पासून कांद्याच्या भावात सारखी चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. एक हजार रु क्विंटल दराने विकणारा कांदा आज मात्र 400 ते 500 रुपये विकत आहे तर दोन नंबरच्या कांद्याला 200 रुपये ही भाव देण्यास व्यापारी तयार नाहीत. कांद्याचे भाव वाढतील या आशेवर काही शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून शेतात ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ नसल्याने, नवीन कांदा चाळ काम सुरू असल्याने, काहींची परिस्थिती कांदा चाळ करण्याची नसल्याने अशा ५० टक्के शेतकऱ्यांनी तर काहींची  कांदा काढणी उशीरा झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे शेतात पडून आहेत.

दोन दिवसा पूर्वी हवामान खात्याने अवकाळी पाऊस येणाचे संकेत दिले होते. ,त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरण्यास सुरवात झाली असून बुधवारी सकाळ पासून मोठ्या प्रमाणात आकाशात ढग दाटुन येत असून वाऱ्यांनी ही आपली दिशा बदली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ताडपत्री घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाऊस येणार असून तो आपल्या मालाचे नुकसान करील  याची मनात भिती आहे. सुरवातीला कांदा लागवड ,खत ,कीटकनाशके कांदा काढणी यावर शेतकऱ्यांचा एकरी 60 ते 70 हजार रुपयांपर्यत खर्च गेला आहे. त्यात कांदा ही बे-भाव विक्री होत आहे.

———————————————–

आमच्या मुलांना पुढे शिकण्यासाठी बाहेर पाठवू जे आम्ही भोगलय ते त्यांना नाही करून देणार पण असेच बे भाव कांदा गेला तर ते ही स्वप्न ….स्वप्नच राहील ..
सतीष थोरात ,शेतकरी  


माझ्याकडे आज दिड हजार किंटल कांदा आहे परंतु ,माझा खर्च 6 ते 7 लाख  रुपये खर्च झाला त्यात भाव नसल्याने झालेला खर्च ही निघणार नसेल तर शेतकऱ्यांनी शेती तरी कशी करावी?

गोकुळ पंडित,शेतकरी

————————————————-

शेतकऱ्यांना नेहमी हाता तोंडाशी आलेला घास नेहमी निसर्ग हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला प्रतिसाद न देता शेतकरी संघर्ष करून नेहमी धडपड करत असतो ,पण हा शेतकरी  हे असेच सुरू राहीले तर हा शेतकरी किती दिवस दम मारणार त्यामुळे शेतकऱ्यांन साठी  सरकारने कांद्याला हमी भाव दिला पाहिजे अशी मागणी ही शेतकरी करत आहे.परंतु शेतकरी माल पिकू शकतो मात्र संघटीत होऊन लढत नाही यांची व्यापारी वर्गाला चांगली जाण असते म्हणून तर व्यापारी ठरवेल त्या भावात शेतकऱ्यांना आपला कांदा विक्री करावा लागतो असा आरोप शेतकरी वर्गातुन होत आहे.