वैजापूर पालिकेच्या वाचनालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- कुशल प्रशासक, दानशूर, धर्मपरायण व लोककल्याण-कारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या २९८ व्या जयंती निमित्त येथील पालिका वाचनालयात  त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सुभाष चाफेकर यानी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अन्य जेष्ठ वाचकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले‌ प्रास्ताविक व सूत्रसंचलन करून धोंडीरामसिंह राजपूत यांनी होळकर यांच्या जीवन कर्तृत्वावर प्रकाश टाकला.  ग्रंथपाल दादासाहेब दळे, शेख मुनीर, राधाकिसन सोनवणे, प्रवीण देशपांडे, केशव क्षीरसागर, विशाल गाढे, नितीन शिंदे, अनिल राजुळे, सुरेश जाधव, संजय राजपूत यांची उपस्थिती होती.